वारीत जायला संधी नाही, मात्र डान्स बार सुरूच, कुणाच्याही आशीर्वादाशिवाय हे शक्यच नाही : फडणवीस
राज्यात माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधनं आहेत आणि डान्सबारवर बंदी असतानाही, ते राजरोसपणे सुरु आहेत. याच विरोधाभासाला उघड करण्यासाठी आम्ही ठाण्यात पोहोचलो आणि ठाण्यातल्या 3 डान्सबारचा स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश केला. जिथे बार सुरु होता, डान्स सुरु होता, बारबाला नाचत होत्या आणि हे सगळं कोरोनाचे सगळे नियम धुडकावून सुरु होतं. या सगळ्या प्रकाराची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे.