Devendra Fadnavis PC | सचिन वाझे यांचा खरा राजकीय सूत्रधार कोण? : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

नवी दिल्ली : मुंबई पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, असं वक्तव विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच 2018 मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे निलंबित असलेल्या वाझेंना पुन्हा घेण्यास मी नकार दिला, असा दावाही त्यांनी केला. राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्यानंतर सचिन वाझे यांच्या अटकेनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचीही उचलबांगडी झाली. त्यानंतर देवेंद फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे यांच्यावरुन सरकारवर निशाणा साधला. तसंच मनसुख हिरण प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी केली.

हे पोलीस दलाचं अपयश नाही तर सरकारचं अपयश आहे. पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण, सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणं गरजेचं आहे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

यावेळी फडणवीस म्हणाले की, पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरण यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत. मूळ प्रश्न आहे तो एपीआय सचिन वाझे यांना नोकरीत का घेतले गेले?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram