Devendra Fadnavis | अधिवेशनातून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
Continues below advertisement
आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सरकार या दोन दिवसात महत्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्याच्या तयारीत आहे. यात प्रामुख्याने महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक शक्ती कायद्यासंदर्भातील विधेयकाचा देखील समावेश आहे. दोन दिवसांऐवजी दोन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर देखील विरोधी पक्षाने बहिष्कार घातला होता.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Assembly Winter Session 2020 Opposition Parties BJP Maharashtra Assembly Devendra Fadnavis Maha Vikas Aghadi