Devendra Fadnavis : शहानिशा करुन कारवाई करा, शरद पवार धमकीप्रकरणी फडणवीसांचे पोलिसांना आदेश
शरद पवारांना ज्या हँडलवरून धमकी आली त्याची शहानिशा करा आणि कारवाई करा, असा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिलाय. आयुक्त फडणसळकर यांनी फडणवीस यांची भेट घेऊन माहिती दिल्यानंतर फडणवीसांनी वरील आदेश दिले.