Devendra Fadnavis on Suraj Chavan ED Raid : ईडीच्या कारवाईबाबत मला माहित नाही : फडणवीस
मुंबईतील कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. विविध निवडणुकांमागे ठाकरे गटाची पदड्यामागची गणितं सूरज चव्हाणांच्या हाती असतात, असं मानलं जातं. तसंच, आगामी मुंबई मनपा निवडणुकीतही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.