Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण

Continues below advertisement

Devendra Fadnavis, मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, या महिलेने उद्विग्नतेतून हल्ला केलाय का? हे जाणून घेऊ. तिने कशामुळे हे पाऊल उचलले हे समजून घेऊ...

देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला कोण आहे? 

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रालयातील कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. धनश्री सहस्त्रबुद्धे असं महिलेचं नाव असून ही महिला घरी एकटीच राहते. आई वडिल काही वर्षापुर्वीच मरण पावले आहेत.  बहीण लग्न करून निघालेली आहे.  सदर महिलेनं काल रात्री इमारतीच्या लिफ्टचा दरवाजा तोडला. सीसीटीव्हीमार्फत महिलेची ओळख पटली आहे. फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणारी महिला दादरमधील एका सोसायटीतील राहिवासी आहे. दादरमधील सोसायटीत देखील ती चाकू घेऊन फिरत असल्याची माहिती आहे. सोसायटीमध्ये देखील ती लोकांच्या दारावर झाडू मारत फिरत असते. तिच्या अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram