Metro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी; 272 कोटी रुपये वितरीत
लोकलनंतर मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रोचं जाळं आता आणखी विस्तारणार आहे.. आणि मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनीही मुंबई मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केलाय..राज्य सरकारने मुंबई, ठाणे, मुंबई उपनगरासह पुणे मेट्रोला भरघोस निधी दिलाय..सरकारकडून तिन्ही मेट्रो मार्गांसाठी जवळपास २७२ कोटी रुपये एमएमआरडीएला वितरीत करण्यात आलाय. मेट्रोच्या कामांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरुपात सरकारला निधी देण्यात आला.. सरकारने दिलेल्या या निधीमुळे राज्यातील मेट्रोच्या कामांना गती मिळणार आहे.
कुठल्या मेट्रोसाठी किती रक्कम
मेट्रो-५ मार्गिकेसाठी
(ठाणे-कल्याण-भिवंडी)
२३.८३ कोटी रुपये
मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर),
मार्ग ७ अ मार्गिकेसाठी
२२ कोटी रुपये
मुंबई मेट्रो-७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व)
२७.५० कोटी रुपये
मुंबई मेट्रो-४ (कासारवडवली)
मेट्रो ४अ (कासारवडवली ते गायमुख)
५६.८३ कोटी रुपये
मुंबई मेट्रो २बी (डीएन नगर ते मंडाळे)
५३.९० कोटी रुपये
मुंबई मेट्रो २अ (दहिसर पूर्व ते डीएन नगर)
२७.५० कोटी रुपये
मेट्रो लाईन ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) ३६.६७ कोटी रुपये