Devendra Fadnavis | पाडणं सोडून द्या, आधी सरकार चालवून तर दाखवा : देवेंद्र फडणवीस
"माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडा," असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील मुलाखतीमध्ये भाजपला दिलं होतं. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "वारंवार म्हटलं जातं की आमचं सरकार पाडून दाखवा. आधी सरकार चालवून दाखवा. पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की सरकार चालवून तर दाखवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.