Devendra Fadnavis: मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून काढायचं काम आमचं आहे- फडणवीस

मुंबई : "विजयाने नम्र व्हायचं, विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लड़ाई मुंबई में होगी," असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला खुलं आव्हान दिलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं आज मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना विजयाने हुरळून न जाता खरी लढाई मुंबईत होणार असल्याचं सांगत त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.

चार राज्यांच्या निवडणुकीचा निकालामधून संपूर्ण देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू अनुभवली. मोदींनी सामान्य माणसांच्या मनात विश्वास निर्माण केला. तो विश्वास खऱ्या अर्थाने मतांच्या रुपात परिवर्तित झाला. गोव्यातील विजय हा मोदींचा आहे, आपल्या त्यात खारीचा वाटा आहे, असं फडणवीस म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola