Devendra Fadanvis On Abu Azmi | अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकणार, फडणवसांचं विधान; तर आझमींना 2-3 दिवसात चौकशीसाठी पोलीस बोलावणार

Devendra Fadanvis On Abu Azmi | अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकणार, फडणवसांचं विधान; तर आझमींना 2-3 दिवसात चौकशीसाठी पोलीस बोलावणार

औरंगजेबाबद्दल बोलणाऱ्या अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलंय..मात्र औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या आव्हाडांचा मविआने निषेध केला का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी अबू आझमींवर तुरुंगात टाकण्यासंदर्भात सांगितलं होत..त्यामुळे यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार का  हे पाहणं ही महत्त्वाचं असणार आहे. 

'अबू आझमींना एवढ्यात अटक नाही'

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती

आझमींना १-२ दिवसांत चौकशीसाठी बोलावणार - पोलीस

या घटनेनंतर मला जीवे मारण्याचे फोन :अबू आझमी

'या घटनेनंतर मला अनेक धमक्यांचे फोन येत आहेत .मला जीवे मारण्याचे फोन विविध नंबर वरून येत आहेत .मी पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज करणार आहे .माझ्या जीवाला काही झाल्यास त्या सरकारला जबाबदार धरावे .वेगवेगळ्या नंबर वरून लोक फोन करून शिव्या घालत आहेत .मी वादग्रस्त काहीही बोललेलो नाही .जे इतिहासात आहे तेच बोललो .मात्र माझ्या बोलण्यामुळे अधिवेशन बंद करणार असाल तर मी माझे शब्द मागे घेतले आहेत .मी इतिहासात जे लिहिला आहे त्याचाच दाखला दिला .असे अबू आझमी म्हणाले . दरम्यान , ठाकरे गटाकडून अबू आझमींच्या वक्तव्यावर टोकदार टीका केली जात आहे .यावर भाजपच्या बी टीमचा नेता असा उल्लेख करण्यात आला होता .त्यावरही अबू अझमींनी प्रत्युत्तर दिले .ते म्हणाले ' मी काहीही बी टीम नाही .ठाकरे गटच उद्या एटीएम सोबत जाईल .तीस वर्ष ते आधीही एकत्र होते .मग शिंदेंचे वही होगा जो मंजुरे खुदा होगा .मी विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन विचारेन की कुठल्या कायद्यानुसार कारवाई केली .कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही दाद मागेन . माझ्यावर दाखल गुन्ह्यांबाबतही कायदेशीर लढा देऊ' असं अझमी म्हणालेत .

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola