Narendra Modi : मुंबईतील विकासकामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटनं

मुंबईतील विकासकामांची उद्घाटनं आणि नव्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, १९ जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंच्या घरानजिक म्हणजे वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्तेही जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीनं मोदींचा मुंबई दौरा निर्णायक ठरणार आहे. मोदींच्या या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रमही ठरला आहे. पंतप्रधान मोेदी हे १९ जानेवारीला मुंबई मेट्रोच्या मेट्रो दोन ए आणि मेट्रो सात या मार्गांचं लोकार्पण करणार असून, त्यानंतर ते मुंबई मेट्रोनं प्रवासही करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola