Mumbai Dengue : मुंबईत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण, पालिकेकडून शोध मोहिम सुरु : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून घरोघरी शोधमोहीम घेऊन डास उत्पत्तीची ठिकाणं नष्ट करण्यात येत आहेत. वेगवेगळी आस्थापने आणि कार्यालयांनाही भेटी देऊन कार्यवाही करण्यात येत आहेत. या शोध मोहिमेत ऑगस्टच्या दोन आठवडय़ांत तब्बल 10 हजार 659 ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस डास तर 1 हजार 578 ठिकाणी मलेरिया पसरवणारा एनोफिलीस डास आढळलाय. जानेवारी ते जूनअखेरपर्यंतच्या कारवाईत 7 हजार 693 जणांना नोटीस बजावण्यात आलीय. तर 6 लाख 41 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. पावसाळ्यात सर्वात मोठे आव्हान ठरणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेने आरोग्य यंत्रणा तैनात ठेवलीय.
Continues below advertisement