Delhi Election Results | भाजपचा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला : अनिल परब | ABP Majha
Continues below advertisement
दिल्ली निवडणूकांच्या 70 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार देशाच्या राजधानीत आम आदमी पक्षाची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाची हॅट्रीक करणार असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत. अशातच आम आदमी पक्षाची सत्ता लोकांनी मान्य केली आहे. तर भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलं आहे, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेने देशाच्या राजकारणाला वळण दिलं आहे. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे देशातही तेच घडत आहे, असंही ते बोलताना म्हणाले.
Continues below advertisement