Deepak Palsule : ABP Majha चे वृत्तनिवेदक दीपक पळसुलेंना देवर्षि नारद पुरस्कार
एबीपी माझाचे प्रतिनिधी दीपक पळसुले यांनी उत्कृष्ट वृत्त निवेदक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्व संवाद केंद्रातर्फे देवर्षि नारद या पुरस्कारनं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. नारद जयंती आणि जागतिक वृत्तपत्र स्वातंत्रदिनाचं औचित्य साधत राजभवनात हा कार्यक्रम पार पडला. पत्रकारिता क्षेत्रात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडियातील प्रतिनिधींना दरवर्षी विश्व संवाद केंद्राच्या पुरस्कार निवड समितीच्या माध्यमातून निवडून हा पुरस्कार दिला जातो.