Mumbai Local : मुंबई लोकलसंदर्भात दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता; अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील : राजेश टोपे
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल कधी सुरु होणार, असा प्रश्न विचारला जातोय. लोकल बंद असल्याने नागरिकाना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करा अशी मागणी होत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा झाली. मुंबई लोकल वाहतुकीसंदर्भात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाईल, अशा काही सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. यासंदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Continues below advertisement