Mumbai : सडक्या चिकनचा काळाबाजार, पण कोण खेळतंय मुंबईकरांच्या जीवाशी? ABP Majha
झणझणीत रस्सा असो, की सुकं असो, कालवण असो की पाश्चात्यांशी नातं सांगणारे शॉर्मा, रॅप किंवा फ्राईड... चिकन म्हटलं की मांसाहारी जनतेचं मन भुलणारच मात्र आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत. ती बातमी बघितल्यावर कदाचित तुम्ही चिकन खाणं सोडून द्यालं. मुंबईमध्ये मृत कोंबड्यांचं चिकन विकणारी टोळी सक्रिय आहे. आणि कदाचित हे चिकन तुमच्याही ताटात येऊ शकतं. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.