Daya Pawar Awards : पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड जाहीर
Daya Pawar Awards : साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या असलेल्या पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यंदा या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड करण्यात आली आहे. 'भुरा' या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत 'बलुतं' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईच्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये २० सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचं वितरण करण्यात येईल.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza Awards MARATHI NEWS Daya Pawar Mumbai Maharashtra News