Dasara Melavaनिमित्त दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येणार?मातोश्रीसमोरील कलानगर जंक्शन संवेदनशील?
दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईला पोलिसांच्या सुरक्षेचं कवच देण्यात आलंय. मात्र असं असतानाही काही ठिकाणी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे.. मुंबई एंट्री पॉइंटवरील टोलनाके, महत्त्वाच्या हायवेवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.. त्यातच बीकेसीसाठी मातोश्रीच्या कलानगर जंक्शनवरुन शिंदे समर्थक कार्यकर्ते मेळाव्याला जातील.. त्यामुळे कलानगर जंक्शनला दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे..