Dahisar River Fest : शिवसेना नगरसेविका Sheetal Mhatre यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन
मुंबईतील दहिसर रिव्हर फेस्टमध्ये हजारोंच्या संख्येनं तरुण-तरुणींची गर्दी उसळली होती. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांंचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय. शिसवेना नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवकन्या प्रतिष्ठान आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दहिसर रिव्हर फेस्टचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असणाऱ्या एकाही तरुण-तरुणीच्या तोंडावर मास्क नव्हता. त्यामुळं आता पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे