Dahanu-Virar Local : मालगाडीचा अपघात; डहाणू- विरार लोकलसेवा ठप्प, कामावर जाणाऱ्यांची स्थानकावर गर्दी

Continues below advertisement

गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे ८ डबे पालघरजवळ घसरले आहे.  या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे ३ ट्रॅक बंद आहे.  विरार ते डहाणू लोकलसेवा पूर्णताह ठप्प झाली असून, सकाळी कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी स्थानकावर पाहायला मिळाली. 

हे देखील वाचा 

Ravindra Dhangekar : भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी दिलेल्या कंपनीला पुण्याच्या रिंगरोडचे काम, रवींद्र धंगेकरांचा आरोप

Ravindra Dhangekar on BJP : भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी देणाऱ्या कंपनीला पुण्याच्या रिंगरोडचे काम देण्यात आले असल्याच गंभीर आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलाय. भाजपने 996 कोटींचा निधी घेतला आणि त्याबदल्यात रोडचे काम संबंधित कंपनीला दिले, असं रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) म्हटलं आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलय. यातून पुणेकरांची दिवसा ढवळ्या फसवणूक करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. 

रवींद्र धंगेकरांचे ट्वीट जशाच तसे...

कंपनीने भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी दिला,त्या बदल्यात आपल्या पुण्याच्या रिंग रोडचे काम त्या कंपनीला दिले. पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैश्यांची दिवसा ढवळ्या लूट केली आहे. शहरात सुरू असलेल्या या सर्व गोंधळात तिकडे पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार, MSRDC चे अधिकारी व ठेकेदार यांच्या लॉबीने इस्टीमेट रेट पेक्षा तब्बल 40-45 % जास्त दराने निविदा भरल्याचे निदर्शनास आले आहे. MSRDC सारख्या महामंडळाने याबाबत व्यवस्थित छाननी करून ही प्रक्रिया राबविणे गरजेचे होते,हेच ठेकेदार NHAI चे काम करत असताना यापेक्षा 25-30% कमी दराने काम करतात. यात आणखी एक गंभीर बाब अशी की ,यातील कंपनीला यातील 3 टप्प्यांचे काम मिळाले आहे, ही कंपनी भाजपला इलेक्टरोल बाँड च्या माध्यमातून निवडणूक निधी देणारी 2 नंबरची कंपनी आहे.या कंपनीने भाजपला तब्बल 996 कोटींचा निवडणूक निधी दिलेला आहे. त्यामुळे चंदा दो  - धंदा लो असाच काहीसा प्रकार आपल्या रिंग रोडच्या कामात देखील झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram