Dadar Shivaji Park:शिवाजी पार्क मैदानामुळे धुळीचं प्रदुषण,रहिवाशांची महाराष्ट्र प्रदुषण मंडळाकडे धाव

दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक लहान मुलं आणि   ज़डतायेत. या सगळ्याला कंटाळून शिवाजी पार्कच्या रहिवाशांनी आता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे धाव घेतली आहे. धुळीचं प्रदूषण होऊ नये म्हणून शिवाजी पार्कवर हिरवळ उगवण्याचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी जाहीर झाला होता. मात्र पालिकेच्या अनेक प्रकल्पांप्रमाणं त्याचेही तीनतेरा वाजले. राजकीय सभा घ्यायची असेल तेव्हा अनेक नेत्यांना शिवाजी पार्क आठवतं.. आता हेच नेते प्रदूषणाविरोधात काही करणार का, ते पाहावं लागेल.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola