Cyclone Tauktae मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर ; पुढील 4 ते 6 तास मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

Continues below advertisement

Cyclone Tauktae : तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. हे चक्रीवादळ  मुंबईतील किनारपट्टीला जरी धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव मात्र मायानगरीवर जाणवणार आहे. किंबहुना त्यास सुरुवातही झाली आहे. चक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा पाहता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram