Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम, मुंबईचा समुद्र खवळला : ABP Majha
Continues below advertisement
बिपरजॉय चक्रीवादळ आज सध्याकाळी उशिरा गुजरातवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ सध्या किनाऱ्यापासून १८० किमी अंतरावर आहे. ५ ते ६ किलोमीटर प्रति तास वेगानं ते गुजरातकडे सरकतंय. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथं वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी एवढा आहे. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्यावर ताशी १२० ते १४५ किमी इतक्या भयंकर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हवलण्यात आलं आहे. गुजरातमध्ये NDRFच्या १८ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात आली आहे.
Continues below advertisement