पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा मुंबई क्राईम ब्रांचला संशय
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामींमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा मुंबई क्राईम ब्रँचला संशय आहे. पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. दरम्यान टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पार्थो दासगुप्ता यांचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढलाय. 30 डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.