कोळी बांधवांची गौराई! दागिन्यांनी मढवत वाजत गाजत माहेरवाशीण आली... खेकडे, सुरमई, पापलेट, कोळंबीचा नैवेद्य!

Continues below advertisement

गणपती आले, त्यांचं स्वागत वाजत गाजत केलं गेलं मात्र आज माहेरवाशीण गौरी अनेकांच्या घरी आल्यात. खास करून कोळी बांधवांच्या घरची गौराई वेगळी असते. खास कोळी पेहरावात तिला बसवली जाते. तर कोळी महिलांचे जीव की प्राण असलेले भरपूर दागिने तिला दिले जातात. याच दागिन्यांनी तिला सजवली जाते. ठाण्याच्या चेंदनी कोळीवड्यात देखील घरोघरी आज गौराईचे आगमन झाले आहे. कोळी गीतांवर ठेका धरत, वाजत गाजत कोळी बांधव आणि महिलांनी तिला घरी आणले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram