Covid Center Scam : सुजीत पाटकरांनी लाच म्हणून सोन्याचे बार वाटले? कोविड घोटाळ्याप्रकरणी मोठी बातमी

Continues below advertisement

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोेपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सेवेच्या भागीदारांपैकी संजय शहा यानं सोन्याच्या बार, बिस्किटं आणि नाणी खरेदी केले, आणि ते सुजित पाटकर या भागीदाराला दिले. मग पाटकर यांनी ते बीएमसी अधिकारी आणि इतरांना वाटले असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. सुजित पाटकर यांनी बीएमसी अधिकार्‍यांना रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू देखील दिल्याचा आरोप ईडीनं केला आहे. 




Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram