Coronavirus Update | ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या 1758वर; तर कल्याण डोंबिवलीतील संख्या 699वर

ठाणे महापालिका क्षेत्रात काल दिवसभरात १९८ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय...ठाण्यात एका दिवसातली कोरोनाग्रस्त रुग्णांची ही सर्वाधिक वाढ आहे... ठाण्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १ हजार ७५८ वर पोहोचलीय...
दुसरीकडे कल्याण ड़ोंबिवली महापालिका क्षेत्रात काल दिवसभरात ५७ नव्या रुग्णांची वाढ झालीय..डोंबिवलीत ३१, कल्याणमध्ये २१, टिटवाळ्यात ४ तर आंबिवलीत १ नवा रुग्ण आढळून आलाय...नव्या रुग्णांमध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे...कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६९९ इतकी झालीय..
नवी मुंबईत कोरोनाच्या ६५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झालीय...त्यामुळं शहरातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजार ४८७ वर गेलाय... आत्तापर्यंत नवी मुंबईत ४९ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola