Ashwini Thavai : अश्विनी थवई मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होणार, पनवेल कोर्टाने दिले आदेश
Continues below advertisement
पनवेलच्या अश्विनी थवई यांच्या मृत्यू प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पनवेल कोर्टाने दिले आहेत. पटेल रुग्णालयासह गांधी रुग्णालय तसंच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट देणारे डॉक्टर अशा एकूण सहा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मे महिन्यात अश्विनी थवई यांचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे अश्विनी यांचा मृत्यू झाल्याचं पटेल रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र चुकीच्या उपचारांमुळे अश्विनी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. कोरोना रिपोर्टबाबत अन्य दोन लॅबमध्ये तपासणी केली असता अश्विनी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता या सगळ्या प्रकरणी सहा डॉक्टराविरोधात निष्काळजीपणासह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement