कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टेन्शन वाढवणारा मृ्त्यूदर!कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह मृत्यूदरातही वाढ

Continues below advertisement

मुंबई : सध्या राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेट कोरोना बाधितांच्या संख्येसह देशभरातील मृत्यूदरातही वाढ होत असल्याचं दिसत आहे. गेल्या चार आठवड्यांमध्ये मृत्यूदरात सरासरी 4.5 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीची 30 पथकं महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. 

सोमवारी देशात नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाल्याचं दिसून आलं. देशात एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली. परंतु, देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यासोबतच मृत्यूदरातही विक्रमी वाढ होत असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधितांची आकडेवरी वाढली तरी, कोरोमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक होती. अशातच आशादायी गोष्ट म्हणजे मृत्यूदर कमी होता. परंतु, आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमधून समोर आलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, देशातील मृत्यूदरात वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांत नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येच्या दराप्रमाणे मृत्यूदरातही वाढ होतेय. गेल्या चार आठवड्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. 8 मार्च रोजी देशात कोरोनामुळे 96 जणांचा मृत्यू झाला होता. 4 एप्रिलला कोरोनामुळे दगावलेल्यांचा आकडा 425 इतका होता. याचाच अर्थ गेल्या चार आठवड्यात मृत्यूदरात सरासरी 4.5 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्याआधीच्या चार आठवड्यांत कोरोना बाधितांची संख्या 50 टक्क्यांनी वाढत होती. मात्र मृत्यूदरात कोणतीही वाढ झाली नव्हती. याचाच अर्थ ज्या वेगाने कोरोना बाधितांची संख्या वाढतेय, त्याच वेगाने देशात मृत्यूदर वाढल्याने साऱ्यांची चिंता वाढली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram