Coronavirus New Strain | ब्रिटनमधून भारतात आलेले 20 जण कोरोनाबाधित
कोरोना व्हायरसमुळं संपूर्ण जगावर ओढावलेलं संकट आता आणखी बळावताना दिसत आहे. पहिल्या (Coronavisus) कोरोना विषाणूच्या आघातातून जग सावरत नाही तोच काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत (Britain) ब्रिटननं साऱ्या जगाला सजग केलं. ज्यानंतर आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका प्रकारामुळं (New Strain) ब्रिटनमध्ये पुन्हा हाहाकार माजल्याचं वृत्त आहे.
अशातच भारतात ब्रिटनमधून आल्यानंतर विमानतळावर जे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत त्यातले अर्धे रुग्ण नव्या घातक स्ट्रेनचे कॅरियर असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सध्या ब्रिटनमधून भारतात आलेले 20 जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलंय.