Mumbai Coronavirus | मुंबईकरांची चिंता वाढली; गेल्या 24 तासात मुंबईत 721 कोरोनाबाधित

Continues below advertisement

मुंबई : राज्यात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. आज राज्यभरात 4 हजार 787 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 20 लाख 76 हजार 093 झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे.

आज 3853 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आजपर्यंत एकूण 19 लाख 85 हजार 261 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.62 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1 लाख 95 हजार 704 जणांना होमक्वॉरन्टीन असून 1664 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीनमध्ये आहेत. राज्यात सध्या 38 हजार 013 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत 24 तासात 721 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही सर्वाधिक वाढ आहे. 721 रुग्णांपैकी 82 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे बरचेसे रुग्ण हे होमक्वॉरन्टीन आहेत. 98 टक्के वाढलेल्या केसेस या हायराईज सोसायटीमधील आहेत. झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या भागातून जास्त रुग्ण नाहीत.

मुंबईत कालपर्यंत 13 हजार चाचण्या होत होत्या. आज 18 हजार 500 चाचण्या केल्या असत्या 721 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. चाचणीचं प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे. परिणामी मुंबईतील कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर 4.50 टक्के इतका आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram