Coronavirus | 130 वर्षात प्रथमच मुंबई डबेवाल्यांची सेवा10 दिवस बंद

 देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 175 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात 20 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा 47 आहे. तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  त्याच पार्श्वभूमीवर सरकारने बंद करण्याच्या आवाहनाला आता मुंबईच्या डबेवाल्यांनी साथ दिली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 ते 31 मार्चपर्यंत डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट घेतला आहे. मुंबईच्या डबेवाल्याच्या जेवणावर अवलंबून असणारे असे दोन लाख ही सेवा बंद झाल्यामुळे प्रभावित होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola