Coronavirus | कोरोनाविरोधातल्या लढ्याला बळकटी, BKCमध्ये MMRDAकडून 1000 खाटांचं रुग्णालय

सध्या सुरू असलेल्या करोना व्हायरसच्या विरोधातल्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार मुंबई  महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 1,000 रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्यासाठी 1000 खाटांचे रुग्णालय निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्राचा कोरोना व्हायरसविरोधातला लढा हा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. एमएमआरडीएकडून निर्माण केल्या जाणाऱ्या या नॉन क्रिटिकल म्हणजेच तब्येत गंभीर नसलेल्या रुग्णांसाठीच्या विलगीकरण सुविधेमुळे वैद्यकीय सेवावर पडलेला ताण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola