Coronavirus Effect | मुंबईतील जिममध्ये शुकशुकाट
जर तुम्ही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचे रहिवाशी असाल, तर आजपासून तुम्हाला व्यायामशाळेत वर्कआऊट करता येणार नाही, स्विमिंगपूलमध्येही जाता येणार नाही... एवढंच काय या वीकेन्डला तुम्हाला घरीच बसून चित्रपट किंवा नाटक पहावं लागणार आहे.. कारण कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या महत्त्वाच्या शहरांमधल्या व्यायामशाळा, जलतरण तलाव, सिनेमा गृह आणि नाट्यगृह पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आलेत.. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत निवेदन देताना हे आदेश दिलेत.