Coronavirus | Kishori Pednekar | धारावी आता लॉकडाऊन झाली पाहिजे : महापौर किशोरी पेडणेकर
Continues below advertisement
मुंबईतील धारावी परिसर आता लॉकडाऊन झाला पाहिजे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्या म्हणाल्या की, धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या परिसरात लहान घर आहेत. लोकं थोडं बाहेर बसली तरी चालेल पण लोकांनी सहकार्य करायला हवं. सरकार जेवण देत तरी लोक घराबाहेर पडतात. बायका भाजी घ्यायला जातात. तुम्ही तुमच्या घरच्यांना, कुटुंबियांना, संपूर्ण इमारतीला धोका पसरवत आहेत, असं पेडणेकर म्हणाल्या.
Continues below advertisement