Coronavirus effect on SSC | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार

Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता, पण सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारिख जाहीर करण्यात येणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram