मुंबईत लसीकरण मोहिमेला ब्रेक लागणार? चेंबूरच्या सुश्रुत रुग्णालयात लसींचे डोस संपले
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडिसिवर औषध मिळत नाहीए. अश्यातच लसींचा साठाही संपत चाललाय. लसींच्याअभावी मुंबईतील 35 हून अधिक खाजगी लसीकरण केंद्र लसींच्याअभावी बंद करण्यात आली आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातील सुश्रुत रूग्णालय हे त्यापैकीच एक. सोमवारी सकाळी काही जण इथ गेल्या आठवड्याप्रमाणे लसीकरण सुरू असेल या अपेक्षेनं आली होती. मात्र मुख्य प्रवेशद्वारावर लस संपल्याचा बोर्ड पाहून त्यांना आल्या पावली परतावं लागलंय.