Corona Mumbai Airport : मुंबई विमानतळावर आढळला कोरोनाबाधित, मुंबई महापालिका सतर्क ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCorona Mumbai Airport : मुंबई विमानतळावर आढळला कोरोनाबाधित, मुंबई महापालिका सतर्क ABP Majha
कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. मुंबई महापालिकेनं कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. कोरोनाच्या बीएफ सेव्हन आणि एकशेवीस पटीनं पसरणाऱ्या एक्सबीबी 1.5 या व्हेरिएंट्सचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. मुंबई विमानतळावर करण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर चाचणीत एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. या प्रवाशाच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेनं जनतेला पुन्हा कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. हात धुणं, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणं आणि स्वच्छता राखणं याबरोबरच मुख्य म्हणजे घराबाहेर मास्कचा वापर करावा, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे.