Good News | धारावीसाठी सुखद धक्का! काल दिवसभरात एकच कोरोनाबाधित आढळला
मुंबईमध्ये मागील दोन महिन्यानंतर काल मंगळवारी पहिल्यांदाच सर्वात कमी 806 कोरोनाबाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे कोरोना हॉटस्पॉट असलेल्या धारावीत काल केवळ एक रुग्ण आढळला आहे. मुंबईत आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या 86,132 झाली आहे. तर एकूण मृतांचा आकडा हा पाच हजारांवर पोहोचली आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितलं की, काल कोरोनाबाधित 806 नवीन रुग्ण आढळल्यानंतर एकूण संख्या 86,132 झाली आहे.
806 हा आकडा मुंबईत मागील 55 दिवसांनंतर रोजचा सर्वात कमी आकडा आहे. याआधी मुंबईत 13 मे रोजी 800 कोरोनाबाधित आढळले होते. मुंबईत पहिला कोरोना रुग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. तर 17 मार्च रोजी पहिला मृत्यू झाला होता. बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे की, 985 रुग्णांना काल हॉस्पीटलमधून डिस्चार्ज दिला आहे. आता मुंबईतील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 58,137 झाली आहे. आता शहरात 22,996 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.