Corona Mock Drill :पोलीस, नर्स ते डॉक्टर; मुंबईच्या JJ Hospital मध्ये कोरोनाचा आढावा घेणारी मॉकड्रील

Continues below advertisement

India Covid-19 Mock Drill: कोरोनाच्या (Coronavirus Updates) तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभर मॉकड्रील (Mock Drill) केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) मॉकड्रिलची पाहणी करण्यासाठी झज्जरच्या एम्स रूग्णालयात उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईत आज सकाळी 11 वाजता जे. जे. रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे. देशात कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज आणि उद्या अशा दोन दिवसांत देशभरात मॉकड्रील पार पडणार आहे.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram