Congress March : मुंबई काॅंग्रेसकडून राजभवनावर मोर्चा, कार्यकर्त्यांना नोटीस
Continues below advertisement
वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करणार आहे.यामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता प्रियंका गांधी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस मुख्यालयातून पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर, राहुल गांधी काँग्रेसच्या खासदारांसह सकाळी ११ वाजता संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राजभवनाला घेराव घालण्याची घोषणा काँग्रेसनं केलीय.
Continues below advertisement