Sachin Sawant vs Ram Kadam | राम कदम यांची नार्को टेस्ट करा, काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मागणी

Continues below advertisement

अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केल्यानंतर सोशल मीडियात कंगनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. अशातच कंगनाची पाठराखण करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांच्यावर निशाणा साधत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच राम कदम यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसने विवेक मोईत्राचीही आठवण करून दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी भाजप नेते राम कदम यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. तसेच सचिन सावंत यांनी आवर्जुन विवेक मोईत्रा यांचाही उल्लेख केला आहे. तसेच कंगनाला भाजपच्या आयटीसेलची साथ आहे. हे मिळून भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram