Bhai Jagtap Reaction : भाई जगताप म्हणाले, जेजुरी गडावर आलो अन् गोड बातमी कळाली
Continues below advertisement
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री अखिल भारतीय कमिटीनं या नियुक्त्या जाहीर केल्या. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हा खांदेपालट करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
Continues below advertisement