BMC Polls: 'राज ठाकरे तो सोडून द्या, आम्ही उद्धवजींसोबतही लढणार नाही', भाई जगताप यांचा काँग्रेसला स्वबळाचा नारा

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी एक मोठं वक्तव्य करून महाविकास आघाडीत (MVA) खळबळ उडवून दिली आहे. 'राज ठाकरे (Raj Thackeray) तो सोडून द्या, आम्ही उद्धवजींच्या (Uddhav Thackeray) सोबतही लढणार नाही,' असे म्हणत जगताप यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांना संधी मिळायला हवी. जगताप यांच्या या भूमिकेवर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'त्यांना बोलू द्या' असे म्हणत यावर अधिक बोलणे टाळले. तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर (Avinash Abhyankar) यांनी 'त्यांना कोणी विचारले आहे का?' असा सवाल करत टीका केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी स्थानिक पातळीवर परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे समर्थन केले, तसेच महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे मुख्य ध्येय असल्याचे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola