Vinayak Mete on Reservation | मराठा आरक्षणावरून मराठा नेत्यांमध्ये गोंधळ? आमदार विनायक मेटेंशी संवाद
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून दोन गट पडले असल्याचं चित्र आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली आणि मराठा समाजातील नेत्यांना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण म्हणजेच इडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण नको. याबाबत जो शासनाने एसइबीसीच्या आरक्षणाचा निर्णय लागेपर्यत तात्पुरत्या स्वरूपात मराठा समाजाला इडब्ल्यूएस कोट्यातून जाहीर केलं होतं त्याबाबत जीआर देखील काढला जाणार होता तो स्थगित करावा अशी मागणी केली होती.