संगणक परिचालकांचं आझाद मैदानावर गेल्या 8 दिवसांपासून आंदोलन सुरु

आझाद मैदानात मागील 8 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील जवळपास 1 हजार संगणक परिचालक आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन अर्थसंकल्पातून किमान वेतन द्या. तसेच सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या सीएससी-एसपीव्ही या दिल्लीच्या कंपनीवर कारवाई करा या मागण्या आहेत. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या सोडवल्या नसल्याने संगणकपरिचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. हे कर्मचारी मागील 10 वर्षांपासून संग्राम आणि आपले सरकार या दोन्ही प्रकल्पात काम करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे 392 कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या दिल्लीच्या सीएससी-एसपीव्ही या कंपनीवर कारवाई करावी.  त्यामुळे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही आंदोलनाची धार आणखी तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आजपर्यंत या आंदोलनाला विधानपरिषद विरोधीपक्ष नेता प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola