Nanavati Hospital मध्ये खास उपक्रम, 'संवाद - यशस्वी महिलांचा प्रेरणादायी प्रवास' : ABP Majha

Continues below advertisement

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं एका प्रेरणादायी उपक्रमाची सुरुवात करण्यात आलीय. 'संवाद - यशस्वी महिलांचा प्रेरणादायी प्रवास' या उपक्रमात नुकतंच विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात विविध क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या महिलांनी सहभाग घेऊन महिलांच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, ज्येष्ठ सिनेपत्रकार भावना सोमय्या, एबीपी माझाच्या उप- कार्यकारी संपादक सरिता कौशिक, चित्रपट दिग्दर्शक रुची नरेन, स्त्रीविकारतज्ज्ञ डॉ. गायत्री देशपांडे आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ कल्पना सारंगी या नामवंत महिलांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram