Coastal Road 2nd phase : मरीन ड्राईव्ह ते वरळी 9 मिनिाटांत गाठता येणार; दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन
Coastal Road 2nd phase : मरीन ड्राईव्ह ते वरळी 9 मिनिाटांत गाठता येणार; दुसऱ्या बोगद्याचं उद्घाटन मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पातील दक्षिण मुंबईला (South Mumbai) उत्तर मुंबईशी (North Mumbai) जोडणारा मरीन ड्राइव्ह (Marine Drive) ते वरळी (Worli) दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पाहणीनंतर हा मार्ग खुला होणार आहे. दरम्यान, आज भूमिगत मार्ग नागरिकांना प्रवासासाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास केवळ 9 मिनिटांत करता येणार आहे. दरम्यान, ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशी 16 तास खुली ठेवली जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प कुठून कुठपर्यंत? मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे यामध्ये 15.66 किमी चे तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल.