Coastal Road : कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन, मरीन ड्राईव्ह ते वरळी आता 9 मिनीटांत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCoastal Road Arati : कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन, मरीन ड्राईव्ह ते वरळी आता 9 मिनीटांत
हे देखील वाचा
स्ट्राईक रेट 80 टक्के, लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील; वर्धापन दिनानिमित्त थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीची खास जाहीरात
Lok Sabha Election Result 2024: सांगली : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं (Nationalist Congress Party - Sharad Pawar) आपली स्वतःचीच पाठ थोपटल्याचं पाहायला मिळालं. पक्षाकडून जयंत पाटील (Jayant Patil) यांचा 'विजयाचा सेनापती' असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
काँग्रेसच्या लोकसभेमधील यशाचं सर्वत्र कौतुक होत असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंही लोकसभेतील यशावरून स्वतःची पाठ घेतली थोपटून घेतली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विजयाचा सेनापती म्हणून नामोल्लेख करण्यात आला आहे. 80 टक्के स्ट्राईक रेट असाही उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे.
जयंत पाटलांचा 'विजयाचा सेनापती' असा उल्लेख
लोकसभा निवडणूक निकालांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवली आहे. त्यापैकी 8 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे 80 टक्के स्ट्राईक रेट, असा उल्लेख जाहीरातीत करण्यात आला आहे. तसेच, नवनिर्वाचित खासदारांच्या हार्दिक अभिनंदनाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटील यांचा विजयाचा सेनापती म्हणून नामोल्लेख करण्यात आला आहे. शरदचंद्र पवार यांच्या सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्थानिक वृत्तपत्रात याबाबत जाहीरात देण्यात आली आहे. तसेच, सांगली शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत.