CNG PNG Price in Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, CNG 3 रुपयांनी तर PNG 2 रुपयांनी स्वस्त
abp majha web team
Updated at:
02 Oct 2023 08:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडने एक मोठा निर्णय घेत सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात 3 रुपयांनी तर पीएनजीच्या दरात 2 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. घरगुती वापरातील आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवे दर आजपासून लागू झालेत. नव्या दरानुसार मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडच्या ग्राहकांना 76 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळेल. तर पीएनजी 47 रुपयांना मिळणार.